ग्रामीण तंत्रज्ञान पदविका अभ्यासक्रम प्रवेश सुचना

उद्योजक , मेकर्स , संशोधक आणि चांगला माणूस बनण्यासाठी

प्रवेश पात्रता :  हाताने काम करण्याची आवड , किमान वय : १५ वर्षे पूर्ण, ग्रामीण भागात राहून शिकण्याची तयारी, खूप उत्साह व धड्पडण्याची वृत्ती 

विज्ञान आश्रम हे 2021-22 या वर्षासाठी “Diploma in Basic Rural Technology” (Batch 2021-22) DBRT या कोर्स ची प्रवेश प्रक्रिया सुरू करत आहे. हा कोर्स नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ ओपनिंग स्कूल (NIOS) कडून मान्यता प्राप्त आहे. ज्या विद्यार्थ्यांना हाताने काम करून शिकण्याची आवड आहे त्यांच्यासाठी हा कोर्स उपयुक्त आहे.

शैक्षणिक पात्रता : किमान ८ वी  , वय : किमान १५ वर्षे

कालावधी : १ वर्षे ( ०१ ऑगस्ट २०२१ – २५ जून २०२२ )

कोविड मार्गदर्शिका :

कॅम्पस वर राहायला आल्यावर विद्यार्थ्यांना कॅम्पस च्या बाहेर जाण्यास परवानगी नसेल.

बाहेर गावांवरून आल्यावर सक्तीचे 7 दिवस विलगीकरणात रहाणे अनिवार्य आहे.

एका खोलीत दोन च विद्यार्थी राहू शकतील. सर्व कोविड मार्गदर्शक सुचनांचे पालन अनिवार्य आहे.

विद्यार्थी स्वतंत्रपणे सायकल चालवणे / धावणे असे व्यायाम करू शकतात.

18 पेक्षा जास्त वयाच्या विद्यार्थ्याने कोविड लशीचा डोस घेऊन कॅम्पस वर यावे.

15 ते 18 वर्ष वयाच्या विद्यार्थ्यांना शासन मार्गदर्शक सुचने प्रमाणे कॅम्पस वर प्रवेश मिळेल.

ज्या विद्यार्थ्यांना 1 ऑगस्ट ला कोर्स ला रुजू होता येणार नाही. त्यांना ऑन लाइन पध्दतीने शिकवले जाईल. व Do-It-Yourself उपक्रम घरी करण्यास दिले जातील. कॅम्पस वर आल्या वर महत्वाची सर्व प्रात्यक्षिके पूर्ण केली जातील.

कोर्स ची  वैशिष्ट्ये :

हा विविध कौशल्यांनी युक्त असा अभ्यासक्रम असून ह्यामध्ये खालील प्रशिक्षण दिले जाते.

  • अभियांत्रिकी : या मध्ये फॅब्रीकेशन आणि बांधकाम आणि सुतारकाम, अभियांत्रिकी आरेखन आणि अकाऊंट इत्यादीचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • उर्जा आणि पर्यावरण : या मध्ये इलेक्ट्रिकल, मोटार रिवायंडिंग,सर्वेक्षण पद्धती सौर आणि बायोगॅस इत्यादीचेप्रशिक्षण दिले जाईल.
  • गृह आणि आरोग्य : या मध्ये शिवणकाम,अन्न प्रक्रिया आणि ग्रामीण लॅबइत्यादीचे प्रशिक्षण दिले जाईल.
  • शेती व पशुपालन : या मध्ये शेती, रोप वाटिका, कुक्कुटपालन , शेळी पालन, हरित गृह, माती – पाणी परीक्षण इत्यादीचेप्रशिक्षण दिले जाईल.
    • संगणक,चिंतन,खेळ,साहस हे सुद्धा ह्या उपक्रमाचाच भाग आहेत.
    • डिजिटल फॅब्रीकेशनसाठी फॅबलॅब आणि ३-D प्रिंटिंग हे ऐच्छिक विषयी आहेत.
    • “काम करत करत शिका” असे ह्या कोर्सचे तत्वज्ञान आहे.
    • अभ्यासाचे माध्यम : मराठी,हिंदी, इंग्रजी.

कोर्सचा कालावधी : ऑगस्ट २०२१२५ जुन २०२२

कोर्स फी :

  • Tuition Fees: Rs.18,000/-
  • वसतिगृह व स्वयंपाक गृह : रु. 18,000 ( रु. 1500 प्रती माह) सकाळी न्याहारी व दुध, दुपारचे व रात्री चे जेवण
  • अमानत रक्कम : Rs.3000/- ( यशस्वी रीत्या कोर्स पूर्ण केल्यावर अमानत  रक्कम परत मिळेल. आकस्मित खर्च, गरज पडल्यास समुपदेशन फी इ. खर्च हा अमानत रकमेतून वजा केला जाईल.)
  • होस्टेल मधील गादी व बेडशीट : 1,000/-
    एकूण फी : A + B + C + D = Rs. 40,000/-

प्रवेश अर्ज हा online भरावा किंवा भरून पोस्टाने किंवा समक्ष पाठवावा.

महत्वाचे :

  1. शिक्षण पध्दत : प्रत्यक्ष अनुभवातून प्रशिक्षण या पध्दतीने विद्यार्थी शिकतील .
  2. जे आपला स्वत:चा व्यवसाय सुरु करू इच्छितात त्यांच्यासाठी हे प्रशिक्षण उपयुक्त आहे.
  3. होस्टेलची सुविधा उपलब्ध आहे.
  4. गरजू विद्यार्थ्यांसाठी मर्यादित कर्जाऊ शिष्यवृत्ती उपलब्धआहे. कोर्स पूर्ण झाल्यानंतर विद्यार्थ्यांनी ती परत करावी अशी अपेक्षा आहे.
  5. मुलीं साठी विशेष शिष्यवृत्ती आहे.
  6. विद्यार्थ्यांनी शिस्तीचे पालन करणे अपेक्षित आहे. सकाळची प्रार्थना,व्यायाम,ध्यान,इंग्रजीवर्ग इ. उपस्थिती आवश्यक आहे.  जे विद्यार्थी शिस्तीचे पालन करणार नाहीत त्यांना दंड केला जाऊ शकतो.
  7. आश्रमातील विद्यार्थ्यांना स्मार्ट फोन वापरण्याची परवानगी नाही. फोन चोरी गेल्यास आश्रमांची जबाबदारी नसेल.
  8. ज्या विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती हवी असेल तर सर्व मूळ प्रमाणपत्र जमा करावी लागतील. तसेच दोन व्यक्तींची शिफारस व हमी पत्र जोडावे.
  9. ज्या विद्यार्थ्यांना आरोग्य विषयक गरजा असतील किंवा दिव्याग विद्यार्थ्यांनी संचालकांशी चर्चा करावी.
  10. आश्रमात कुठल्याही प्रकारचे व्यसन करण्यास मनाई आहे. आढळल्यास आश्रमातील प्रवेश रद्द होऊ शकतो.

प्रवेश घेण्यासाठी :

माहितीपत्रे

अधिक माहिती साठी  :

श्री. विशाल जगताप : 9730005025

श्री. कैलास जाधव : 9730005030

श्री. रणजीत शानबाग : 9579734720

अधिक माहिती किंवा सुचना : योगेश कुलकर्णी : 9730005016

पत्ता : विज्ञान आश्रम , पाबळ जि.पुणे ४१२४०३ 

Share This